Dot सार्वजनिक
[search 0]
अधिक
Download the App!
show episodes
 
आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासा ...
  continue reading
 
Loading …
show series
 
दिवस इतके बदललेत की आता कुठल्या गोष्टीबद्दल आपल्यात भावनाच शिल्लक राहिल्या नाहीत, सणांचा आनंद नाही, युद्धाचं दुःख नाही, भरभराटीचं सुख नाही, कितीही मिळालं तरी तृप्ती नाही. आयुष्य यांत्रिक झाली आणि आपण आपल्या पुढच्या पिढीच्याही नकळत तेच हातात देणार आहोत. आपल्यातली आपुलकी ही जुन्या पातळासारखी दिवसेंदिवस विरळ होत चाललीये. विरळ याकरिता कारण अजूनही काही …
  continue reading
 
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण डोन्ट वरी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवी गोष्ट, एक नवा आनंद! Story Junction Marathi Podcast वर आजची स्टोरी खऱ्या आयुष्यावर आधारित आहे; आता तुम्ही म्हणाला कुणाच्या ? तर प्रत्येकाच्या! हि फेस प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एकदा नक्की येते आणि आयुष्य वाटेवर अनन्या ऐवजी पार वाट लावून जाते. तुम्ही जर जॉ…
  continue reading
 
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण याचीच परतफेड म्हणून आम्ही घेऊन आलोय एक भन्नाट Podcast Series, 'The Last chapter'!! याशिवाय आजचा दिवस आपल्यासाठी फार विशेष आहे, कारण आज स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्टला एक वर्ष पूर्ण झालंय आणि शून्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात आज विविध देशांमधून आपल्यासोबत ३०,००० हून अधिक लोक जोडले गेलेत. आणखी एक महत्वाच…
  continue reading
 
सचिन डोक्यात राग घेऊन घराबाहेर पडला खरा पण पुढे काय? ते म्हणतात ना, तळ्यातल्या बेडकाला समुद्रातील अडचणींची कल्पना नसते; त्याप्रमाणेच सचिनलाही बाहेरच्या जगाची मुळीच कल्पना नाही. इथे जेवढे चांगले लोक आहेत त्याहून कैकपट विक्षिप्त, क्रूर आणि निर्दयी माणसांची गर्दी आहे, तिला तोंड दिलं तर जिंकला, नाहीतर संपला. मुळात सचिन आता जाणार तरी कुठे? कुठे राहणार? …
  continue reading
 
स्वप्नांना ध्येय बनवून त्यांच्यामागे धावणं उत्तमच, पण तडकाफडकी निर्णय घेऊन आपण काही अनभिज्ञ अडचणींना निमंत्रण देत असतो. सचिननेही तेच तर केलं, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता इथे आला. या नव्या शहराने शहराने त्याला गोंजारलं, थोपटलं, राहायला एक कोपरा आणि जीवाला क्षणिक विसावा दिला. पण रस्त्यातल्या मोजक्या काट्यांना सचिन फार लवकर कंटाळला. कदाचित त्याला…
  continue reading
 
मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलंत की सचिनला राघवने कशाप्रकारे वाचवलं आणि फायनली सचिनला राहण्यासाठी घरही मिळालं. आयुष्याच्या वळणावर बऱ्याचदा अशा अडचणी समोर उभ्या राहतात तेव्हा वाटतं की बस, आता स्वतःला संपवावं. तेव्हा जरा थांबायला हवं आणि एकदा, फक्त एकदा विचारपूर्वक असा विचार करायला हवा की, खरंच संपलं सगळं? यहां हर चीज का सोल्युशन हैं मेरे भाई, इथे कध…
  continue reading
 
गोष्ट जसजशी पुढे जातीये गुंता आणखीनच वाढत जातोय. राघव असा का वागतोय? सायली बिचारी गोड मुलगी आता कुठे जाणार? आणि सचिन यावर काही करणार की नाही?? मैत्रीत चढ-उतार तर येतातच पण इथे त्यामागचं नक्की कारण काय? तेच कळायला मार्ग नाही. असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असले तरी त्यांची उत्तरं काही जास्त लांब नाही, सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल, त्यासाठीच ऐका 'The L…
  continue reading
 
मित्रांनो, आता आपण या सिरीजच्या शेवटच्या भागात आहोत. जर तुम्ही द लास्ट चॅप्टरचे यापूर्वीचे 5 एपिसोड्स ऐकले नसतील तर आधी ते ऐका जेणेकरून तुम्हाला हा भाग कळेलही आणि या सिरीजची पूर्ण मजा घेता येईल. जर तुम्ही या आधीचे एपिसोड्स ऐकले असतील तर मागच्या भागात काय झालं हे तुम्हाला ठाऊक असेलच. तर आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची घाई झालीये ना? सो उगाच वेळ…
  continue reading
 
प्रेम... कुणी माणसांवर करावं, कुणी प्राण्यांवर तर कुणी आपल्या कामांवर! प्रेम कुणावरही असो, अनुभव मात्र खूप देतं; कधी हळवा आनंद देतं तर कधी बोचणारे दुःख, कधी आयुष्याच्या सागरात हेलकावे खात-खात लांबवर घेऊन जातं तर कधी क्षणार्धात बुडवून सगळं संपवून टाकतं. तरीही प्रेम म्हणजे काळ, वेळ, परिस्तिथी, वय या सगळ्यांच्या मर्यादा न जुमानता हवंहवंसं वाटणारं एक स…
  continue reading
 
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बाहेगावांवरून येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन सेंटर्सला थांबवलं जात होतं. त्या काळात अनेकांनी काही नवनवीन अनुभव घेतले. हा एपिसोड म्हणजे आपल्या एका मित्राला क्वारंटाईनमध्ये आलेला असाच एक आगळावेगळा अनुभव! आपला हा मित्र त्याच्या गावाबाहेरच्या गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईनसाठी थांबलाय. पण हे गेस्ट हाऊस हॉंटेड असून इथे एक भूत रा…
  continue reading
 
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. काही कुटुंब पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले तर काही आणखीनच दुरावले. मात्र या सर्वांपलीकडे काही कुटुंब अगदी उध्वस्तही झाले. अशाच एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. सुखी, आनंदी असणाऱ्या या कुटुंबाच्या सुखाला नकळत गालबोट लागलं आणि घटनांच्या ग्रहणाने या कुटुंबाला कायमचं अंधारात ढकलून दिलं. या कुटुंबाचा कर्ता पुरुष हा ए…
  continue reading
 
शेतकऱ्याचं नशीब निसर्गावर अवलंबून असतं. जगाला अन्न पुरवणारा हा शेतकरी निसर्गाने साथ दिली नाही तर स्वतःच उपाशी राहतो. आजच्या गोष्टीतील शेतकऱ्याला सद्यस्थितीत निसर्गाने तर साथ दिली पण वेळेने नाही. रात्रंदिवस कुटुंबासोबत शेतात राबलेला हा शेतकरी सुगीच्या आशेने एक स्वप्न उराशी बाळगून बसलाय. पण वेळ अशी आली की त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं हे स्वप्न स्वप्…
  continue reading
 
रोजच्या कमाईवर स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरणारा एक व्यक्ती लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावून बसतो आणि नाईलाजाने कुटुंबाला सोबत घेऊन गावचा रस्ता धरतो. जगण्याची नवी आशा मनात घेऊन गावची वाट पायी तुडवत हे कुटुंब निघालंय. पण ही वाट त्यांना एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाते. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षातही अनेक मजूर, कामगार काम नसल्याने अशाच रीतीने आपापल्या गावी नि…
  continue reading
 
'लॉकडाऊनच्या गोष्टी' सिरीजमधील ही तिसरी गोष्ट! टायटलवरून तुम्हाला थोडाफार अंदाजा आलाच असेल की ही एका लग्नाची गोष्ट आहे. पण ज्यांचं लग्न व्हायचंय ते कपल आहे आजच्या पिढीतलं, ज्यांना पारंपरिक विवाह सोहळ्यात होणारा अनेक गोष्टींचा अपव्यय टाळावा असं वाटतं. पण त्यांचे आईवडील मात्र सगळ्याच ९० च्या दशकातील आईवडिलांसारखे आहेत. त्यातल्या त्यात यांना लव्ह मॅरे…
  continue reading
 
दंगली झाल्या की सर्वप्रथम गदा येते बस वर; फक्त बसवर नाही तर त्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरवर. पुढचा मागचा विचार न करता लोक सरळ बस पेटवून देतात. पण त्यात निर्दोष सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. आजची स्टोरी अशाच एक कंडक्टरच्या आयुष्याची आहे ज्याने दंगली पाहिल्या, जाळपोळ पाहिली, आयुष्याच्या चढ-उताराने …
  continue reading
 
लॉकडाऊनच्या गोष्टींमधील ही पहिली स्टोरी आहे एका कपलची, ज्यांचं अरेंज मॅरेज झालंय. हे दोघे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे आहेत. पण त्यांच्या याच स्वभावांमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांच्या नात्यात एक आश्चर्यकारक बदल घडतो, पण तो चांगला की वाईट हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड आवर्जून शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आयुष्यात अनेक गोष्टींची आपल्याला अपेक्षा अस…
  continue reading
 
एक व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन सैरभैर धावतोय, त्याला माहितीये थांबला तर संपला! पण असं काय लागलंय त्याच्यामागे आणि का तो त्याच्यापासून पळतोय? हे जाणून घेण्यासाठी ऐका आमचा आजचा पॉडकास्ट मरण्याच्या क्षणभर आधी कळलं… काही चुका माणसाला आयुष्यभर कळत नाहीत आणि जेव्हा कळतात तेव्हा फार उशीर झालेला असतो, मात्र तेव्हा गेलेली वेळ परत येत नाही. स्टोरीतून मी तुम्…
  continue reading
 
गप्प बसून अन्याय सोसणाऱ्याला आपण कोण आहोत हे आठवण करून देणारी आमची तिसरी स्टोरी…पण तुम्ही माणूस नाही!!" ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठ…
  continue reading
 
आपलं मन हे फारच चंचल असतं, त्याला स्थैर्य म्हणून कधी नसतंच. असंच एका तरुणाचं मन एका सुंदर तरुणीवर येऊन ठेपलंय आणि त्याचं महत्वाचं कारण आहे पाऊस! पावसात चिंब भिजलेली ती अनोळखी सुंदर मुलगी पाहून हा तरुण तिला दूर घेऊन गेला, तिच्या सोबत चहा प्यायला, तिच्या नाजूक बटांशी खेळला पण तिला याची खबरही नाही! आता तुम्ही म्हणाल "हे कसं शक्य आहे?" अहो शक्य आहे. ऐक…
  continue reading
 
आम्ही सादर करतोय आमची पहिली स्टोरी, "दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!" एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे;…
  continue reading
 
आम्ही सादर करतोय आमच्या पहिल्या वहिल्या गोष्टीचा ट्रेलर जीचं नाव आहे दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही! एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-ल…
  continue reading
 
Loading …

त्वरित संदर्भ मार्गदर्शिका