==="सभी लोगों के लिए अच्छी खबर" -(हिंदी,বাঙালি,తెలుగు,मराठी,தமிழ்,اردو,ગુજરાતી,ಕನ್ನಡ,മലയാളം,ଓଡ଼ିଆ,ਪੰਜਾਬੀ,Ôxômiya,etc.)-संख्या से सर्वाधिक बोली जाने वाली भाषाओं (१-१२) भारत में // (Hindi,,Bengali,Telugu,Marathi,Tamil,Urdu,Gujarati,Kannada,Malayalam,O
«
»
मराठी चर्च स्तोत्र - "घ्या निखा देह माझा".mp4
Manage episode 213799590 series 1329830
Marathi Church Hymns - "Take and eat my flesh".mp4 //
1 करिंथकरांस - अध्याय 15
1 आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते, की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळकट आहात.
2 आणि जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे. ज्या वचनाने मी तुम्हांस सुवार्ता सांगितली ते तुम्ही दृढ धरता तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काही उपयोग नाही, नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे.
3 कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे.
4 व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले.
5 व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना,
6 नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत.
7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
8 आणि शेवटी मी जो अवेळी जन्मलो, त्या मलासुद्धा तो दिसला.
9 कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला.
10 पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
11 म्हणून, जरी मी तुम्हांला उपदेश केला किंवा त्यांनी उपदेश केला, तरी आम्ही सर्व हाच उपदेश करु, आणि तुम्ही यावरच विश्वास ठेवला.
67 एपिसोडस