Episode 1: Marathi Church Song-(Ciuriosity Songh).3gp

5:10
 
साझा करें
 

Manage episode 223049330 series 1329830
Tze-John Liu द्वारा - Player FM और हमारे समुदाय द्वारा खोजे गए - कॉपीराइट प्रकाशक द्वारा स्वामित्व में है, Player FM द्वारा नहीं, और ऑडियो सीधे उनके सर्वर से स्ट्रीम किया जाता है। Player FM में अपडेट ट्रैक करने के लिए ‘सदस्यता लें’ बटन दबाएं, या फीड यूआरएल को अन्य डिजिटल ऑडियो फ़ाइल ऐप्स में पेस्ट करें।
itunes pic
मराठी चर्च सॉंग -"(करुसाचे गाणे)".3gp //
योहान 1

शब्द मनुष्य झाला!

1. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
2. तोच प्रारंभी देवासह होता.
3. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीही झाले नाही.
4. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते.
5. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो व अंधाराने त्याला ग्रासले नाही.

6. देवाने एक मनुष्य पाठवला. त्याचे नाव योहान असे होते.
7. तो साक्षीकरता, म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा.
8. तो स्वतः प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला होता.

9. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता.
10. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही.
11. तो स्वकीयांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.
12. मात्र ज्यांनी त्याचा स्वीकार केला व त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
13. त्यांचा जन्म रक्त, किंवा देहवासना, किंवा मनुष्याची इच्छा, ह्यांच्यामुळे झाला नाही, तर देवाकडून झाला.

14. शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.

15. त्याच्याविषयी योहानने साक्ष दिली आणि आवेशाने म्हटले, “‘जो माझ्या मागून येत आहे, तो माझ्या पुढचा आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी सांगितले, तो हा आहे.”

16. त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.
17. नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली.
18. देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पित्याच्या उराशी असतो त्याने पित्याला प्रकट केले आहे.

412 एपिसोडस